Activities

विभागीय ग्रंथालय :

      अर्थशास्त्र विभागाचे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयामध्ये 50 पेक्षा जास्त संदर्भग्रंथव आर. बी. आय. चे वार्षिक अहवाल आहेत. त्याचबरोबर प्राध्यापकांकडून स्वत:ची संदर्भ पुस्तके देखील पुरविली जातात.

रोखे बाजार व्यवहार कोर्स :

      विध्यार्थ्यांना रोखे बाजार व्यवहाराचे ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी निरंतर शिक्षण अभ्यासक्रमातंर्गत अर्थशास्त्र विभाग सन 2020-21 पासून रोखे बाजार व्यवहार हा कोर्स सुरू करण्यात आला आहे.

Whatsapp ग्रुप :

      कोव्हिड-19 च्या कालावधीत शैक्षणिक प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी Whatsapp ग्रुप तयार केला असून ग्रुपच्या माध्यमातून आवश्यक सूचना दिल्या जातात तसेच झुम Appच्या माध्यमातून लेक्चर घेण्यासाठी लिंक दिली जाते. विद्यार्थ्यांना शिकवलेल्या प्रकरणासंदर्भात लिखित नोट्स तसेच व्हिडीओ पाठवले जातात.

अंतर्गत मूल्यमापन पध्दती :

      विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन करण्यासाठी ओपन बुक एक्झाम, प्रिलिमिनिरी एक्झाम, वस्तूनिष्ठ परिक्षा इत्यादी मूल्यमापन पध्दतीचा अवलंब केला जात असून विद्यार्थ्याकडून सेमिनार व प्रोजेक्ट तयार करून घेतले जातात.

माजी विद्यार्थी :

      विभागाचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांनी आपआपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे.....

सामाजिक बांधिलकी :           

      अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक बांधिलकीची जपणूकही केली आहे. याचाच एक भाग म्हणून ऑगस्ट 2019 ला उद्भवलेल्या महापूर या नैसगिक संकटाचे स्वरूप लक्षात घेता संकटग्रस्तांना आधार देण्याच्या दृष्टीने तांदुळ देण्यात आले. तसेच समाजप्रती असणारी दातृत्वाची भावना लक्षात घेऊन आसूर्ले पोर्ले कारखाना परिसरातील ऊसतोड कामगारांना व त्यांच्या मुलांना जुने परंतू वापरणे योग्य असणारे कपडे व इतर उपयुक्त साहित्य देण्यात आले. कोव्हिड-19 च्या कालावधीत मार्च व मे 2020 या महिन्यातील एक दिवसाचे वेतन शासनाला मदत म्हणून दिले जाते. डॉ. एस.एस.राठोड यांनी कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल, म्हैसाळ येथे इ. 10 वी मध्ये प्रथम येणार्‍या मुलीसाठी 1000 रुपये रक्कम पारितोषिक म्हणून देतात व त्याच हायस्कूलसाठी सौ. राठोड यांनी 10,000 रुपयांची मदत दिली आहे.

पारितोषिक नोंदी :

        बी.भाग 1, 2 3 मध्ये अर्थशास्त्र विषयामध्य तसेच बीकॉम भाग तीन मध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र विषयामध्ये प्रथम येणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थ्यानीसाठी अर्थशास्त्र विभागाकडून पारितोषिके दिली जातात.

No comments:

Post a Comment